लखलखणारे पुनवचांदणे सर्वांगावर लेऊन ये
तुझ्या मुलायम ओंजळीतुनी स्वप्न उद्याचे घेउन ये
लालकेशरी सुर्यकळीचा भाळावरती लाव टीळा
क्षितिजावरला चंद्र देखणा कुंतलातुनी माळुन ये
दारी माझ्या आल्यावरती प्राजक्ताशी थांब जरा
गंधवादळी बहरामध्ये चिंबचिंबशी न्हाउन ये
घरात माझ्या चैतन्याच्या चार अक्षता टाक गडे
उरात माझ्या सळसळणारी वीज अनामिक होऊन ये
लखलखणारे पुनवचांदणे सर्वांगावर लेऊन ये
तुझ्या मुलायम ओंजळीतुनी स्वप्न उद्याचे घेउन ये
स्वप्न उद्याचे घेऊन ये
कवीः प्रसाद कुलकर्णी
ग्रंथाली
तू शब्दांचा हा नजराणा दिलास हातांमध्ये
शब्द फुलांचा गंधच आता रंध्रां रंध्रांमध्ये
नरेंद्र प्रभू
आत्माची भ्रमणगाथा
-
असे पाहतो जीवन त्याचे फिरत्या चाकावरीकिती पहा हे देश पाहिले धडकी भरते
उरीजरा विसावा नसतो त्याला उडतो तो अंबरीआत्माची ही भ्रमणगाथा देशोदेशांतरीजरा
जाऊन येत...
1 week ago
0 comments:
Post a Comment