वयाच्या चाळिशीपासून ते वार्धक्यापर्यंत असंख्य व्याधी शरीरात उद्भवतात, त्या वेळी खूप काळजी घ्यावी लागते. एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे ‘प्रथमोपचार’. हे घरच्या घरी करता येतात. तथापि त्यापूर्वीची पायरी सांभाळणे चांगले. म्हणजेच उपचाराची आवश्यकता भासू नये, अशी शरीराची स्थिती असणे यालाच ‘शून्योपचार’ म्हणतात. प्रथमोपचार याचा अर्थ डॉक्टर येईपर्यंत करावयाचे उपचार; परंतु डॉक्टरांना बोलवायची वेळच येऊ नये यासाठी करावयाचे उपचार म्हणजे ‘प्रथम’च्या आधीचे उपचार म्हणून ‘शून्य- उपचार’ अथवा ‘शून्योपचार’ असा याचा अर्थ आहे. शून्य खर्चामध्ये करावयाचे उपचार, घ्यावयाची काळजी, लहान-सहान कृती की ज्यामुळे आपले आरोग्य कायम राहते.
थोडक्यात म्हणजे शरीर आणि मन या दोघांचा या पद्धतीमध्ये विचार केला आहे. या पद्धतीमध्ये वजन कसे कमी करावे, रक्तामध्ये विषारी द्रव्ये कशी येतात (रक्त अशुद्ध कसे बनते.), आपला दिनक्रम कसा असावा, दीर्घायुष्यासाठी काय करावे, विश्रांती कशी घ्यावी, व्यायाम- योगासने यांची कशी विभागणी करावी, आहार कोणता व किती घ्यावा, झोपेचं महत्त्व किती आहे या सर्वच गोष्टींचा यात समावेश आहे.
अरुण भालेराव, डोंबिवली
शून्योपचार अर्थात आरोग्यम धनसंपदा
शून्योपचार म्हणजे घरगुती उपचार, ज्या गोष्टींकरिता डॉक्टरांची आवश्यकता नसते. शून्योपचार म्हणजे प्रश्नथमिक उपचार किंवा आजीबाईंचा बटवा ज्यामध्ये छोटय़ा-मोठय़ा आजारांवर आपण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींद्वारे औषधोपचार करू शकतो. मानवी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे शून्योपचार. या उपचार पद्धतीत ‘आजारी पडल्यावर आरोग्याची काळजी करणे’ यापेक्षा ‘आजारी पडू नये म्हणून आरोग्याची काळजी घेणे’ यावर जास्त भर दिला गेला आहे. शून्योपचारात खालील बाबींचा समावेश करता येतो.
(१) आयुर्वेद- आपली प्रकृती ही वात- कफ- पित्त यांनी बनलेली आहे तसेच ऋतुमानानुसारही आपल्या खाण्या-पिण्यात बदल करणे आवश्यक आहे. यामध्य ेDiet = Edit हे सूत्र लक्षात ठेवा. घरगुती जेवणाला पर्याय नाही याला दुमत नसावे (Ref : Zoro Therapy). स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाचा औषधी उपयोग आपण समजावून घेतला पाहिजे. ज्योतिषशास्त्रातही आपल्या जन्मनक्षत्र वृक्षाचा आरोग्याकरिता कसा उपयोग करावा हे सांगितलं आहे शिवाय पथ्यालाही महत्त्व आहेच. What to do पेक्षा What not to do is also important हे लक्षात ठेवा.
स्वअभ्यास :- एखाद्या बुजुर्ग नाडी वैद्याकडून आपली प्रकृती कशी आहे ते समजावून घ्या.
(२) योगासने - योग- आसने म्हणजे भारताने जगाला दिलेला एक अनमोल ठेवा होय. ‘योग’ या विभागात प्रश्नणायाम, ध्यानधारणा, दीर्घश्वसन, मौनव्रत इ. अनेक म्हणजे अनेक उपविभाग आहेत ज्यायोगे आपण ‘योगा’ला जवळ करून ‘रोगा’ला दूर ठेवू शकतो.
स्वअभ्यास : (अ) रोज कमीत कमी सहा सूर्यनमस्कार घालावेत.
(ब) आपल्या घराजवळील योग वर्गामध्ये नाव नोंदवा. कारण घरी या गोष्टी होणं कठीणच.
(क) वृक्षासन, ताडासन, मार्जारासन या आसनांद्वारे Body Balancing जमतंय याचा अंदाज घ्या.
(ड) उभं राहून कशाचाही आधार न घेता पायात मोजे घालण्याचा प्रयत्न करा.
(ई) रेकी, सुदर्शन क्रिया, ब्रह्मविद्या, विपश्यना, महिपाटी इ. अनेक ध्यानधारणेचे सर्व प्रकार शिकून घ्या. त्यातील तुम्हाला कुठला फायदेशीर आहे याचा शोध घ्या.
(फ) दर चार महिन्यांनी एकदा सकाळी सात ते सायंकाळी सात मौन व्रत आचरणात आणा.
(३) पाणी चिकित्सा- आपल्या शरीरात ८० टक्के पाणी आहे. Water therapy मुळे अनेक छोटे-मोठे रोग बरे होऊ शकतात. गरम पाण्याने शेकणे, गार पाण्याचा रूमाल डोळ्यावर ठेवणे, फक्त पाणी पिऊन उपवास करणे (झेपत असल्यास) इ. अनेक गोष्टी यामध्ये येतात. अनेक शुद्धीक्रियात पाण्याचा उपयोग केला जातो.
(४) शिवांबू चिकित्सा : या चिकित्सेकडे ‘याऽऽऽक’ या दृष्टिकोनातून बघितले जाते. अनेक दिग्गज लोक याचा लाभ घेत आहेत, पण ते जाहीररीत्या कबूल करीत नाहीत. काही विशिष्ट जातीजमातीमध्ये याचा उपयोग सर्रास केला जातो. शिवांबू चिकित्सेमध्ये कुंडलीतील कुयोगांची तीव्रता कमी करण्याचे सामथ्र्य आहे, असा काही लोकांचा विश्वास आहे. मुळात शिवांबू चिकित्सा म्हणजे सकाळी लवकर उठून ग्लासभर शिवांबू पिणे हे डोक्यातून काढून टाका. अगदी सुरुवातीला एक घोट शिवांबू (भरपूर पाणी मिसळून) घेतलंत तरी चालेल. या ‘चकटफू’ चिकित्सेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पुढील २४ तास तुमच्या मनात फक्त सकारात्मक विचार येत राहतात असा अनेकांचा अनुभव आहे. कोल्हापूर येथे या विषयावर मोठय़ा प्रमाणात संशोधन चालू आहे.
स्वअभ्यास : या विषयावरील मराठी पुस्तके तसेच water of life हे इंग्रजी पुस्तक वाचावे.
५) फळचिकित्सा : फळांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत. त्याचा उपयोग आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता करू शकतो. सफरचंद, आवळा, डाळिंब, वेलची वेल इ. अनेक फळांचा समावेश आपण रोजच्या आहारात केला पाहिजे. फळं शक्यतो नुसती खावीत, ज्यूस करू नये.
स्वअभ्यास : बाजारातून थोडीशी आवळा पावडर विकत आणा. एका कपात दोन घोट कोमट पाणी घ्या. त्यात पाव ते अर्धा चमचा आवळा पावडर मिसळा. हे मिश्रण प्या आणि वर एक कप कोमट पाणी प्या. असे आठवडय़ातून दोन ते तीन दिवस करा. रोज नको.
६) आरोग्य नोंदवही : आपल्या आरोग्याकरिता नोंदवहीत निरीक्षणे लिहून ठेवा. आपलं वय, पेशा आणि स्वभाव याचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. तो जाणून घ्या. आपली झोपण्याची, बसण्याची सवय योग्य आहे का याचा शोध घ्या. नखं कुरतडणे, सारखं थुंकणे, ब्रशिंग करणे इ. वाईट सवयींना रामराम करा. Man is a bundle of bad habits तेव्हा वाईट सवयींचे उच्चाटण करा, स्वभावात आपोआप (चांगला) बदल होईल.
स्वअभ्यास : दर सहा महिन्यांनी दंतवैद्याकडे जाऊन दातांची नियमित तपासणी करा.
७) व्यायाम : व्यायामाकरिता थोडा वेळ काढणं जरुरीचं आहे. खेळ, पोहणे, चालणे इ. गोष्टींना आपल्या tight schedule मध्ये स्थान द्या. पुरेशी विश्रांती घेणं जरुरी आहे. उगाच rat race मध्ये स्वत:वर अतिरिक्त ताण देऊ नका. आपली आहारशैली/ जीवनशैली आपल्याला पोषक आहे ना याची खात्री करा. दुसऱ्याची कॉपी करू नका.
८) मंत्रोपचार : सर्वच धर्मात मंत्रोपचार, प्रश्नर्थना इ. गोष्टींना महत्त्व आहे. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून स्तोत्रपठण, मंत्रघोष, होमहवन इ.चा आधार आपण घेतो. वास्तुशास्त्रातही constant flow of +ve energy in house याला महत्त्व दिले आहे. कारण याचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे.
(९) चुंबकचिकित्सा : ही चिकित्सा अतिशय प्रगत आहे, पण दुर्दैवाने चुंबकचिकित्सा शिकवणारी मंडळी आता कमी आहेत. आपली पृथ्वी, इतर ग्रह इ. सर्व चुंबकाचे मोठे गोल आहेत. त्याचप्रमाणे आपले शरीर एक चुंबक आहे. या सर्वामध्ये जी देवाण-घेवाण चालू असते त्यामुळेच चांगल्या-वाईट घडामोडी घडतात, असे आपण मानतो. चुंबकतेल, चुंबकजल, चुंबकावर हात-पाय ठेवणे इ.मधून आपल्याला आरोग्यप्रश्नप्ती होऊ शकते.
स्वअभ्यास- या चिकित्सेवरील इंग्रजी/ मराठी पुस्तके वाचणे.
(१०) तेलमालीश - मसाज थेरपी ही एक स्वतंत्र शैली असून अनेक छोटय़ा-मोठय़ा रोगांवर रामबाण इलाज म्हणून काम करते. अर्थात याकरिता तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता आहे. आपणही स्वत:करिता ही थेरपी शिकू शकतो.
स्वअभ्यास : (अ) रोज रात्री झोपताना तळपायाला थोडे खोबरेल तेल जिरवा आणि deep sleepचा आनंद घ्या.
स्वअभ्यास : (ब) आंघोळ करताना साबण वापरू नका. एक मध्यम आकाराचा टर्किश टॉवेल घ्या. ‘अर्धी’ आंघोळ झाल्यावर टर्किश टॉवेलने अंग ‘घासून पुसा’. नंतर उरलेली अर्धी आंघोळ करा. साबणाची गरज नाही.
(११) संगीतोपचार- या विषयावर काही लिहिण्याची गरज नाही. संगीत हा आपल्या सर्वाचाच आवडीचा विषय आहे. मात्र कानात वायर घालून संगीत जास्त वेळ ऐकू नका एवढीच विनंती. संगीतातील वेगवेगळे राग, तालवाद्य, कंठसंगीत इ.चा आरोग्यावर होणारा चांगला परिणाम यावर बरेच संशोधन चालू आहे.
(१२) याचबरोबर हास्यथेरपी, स्वयंसूचना, अॅक्युप्रेशर, पदभ्रमण इ. अनेक गोष्टींचा उपयोग/ समावेश शून्योपचारात करता येऊ शकेल.
अशा रीतीने शून्योपचाराचा आधार घेऊन आपण आपले आरोग्य शेवटपर्यंत निरोगी ठेवण्यात यशस्वी झालो तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट या जगात नसेल. शून्योपचारात खालील गोष्टींचा Accessory म्हणून उपयोग करता येऊ शकतो.
(१) झोपाळा- तुमचे घर थोडेसे मोठे असेल तर गॅलरीत एखादा झोपाळा जरूर असू द्या. त्याचे अनेक फायदे आहेत. गप्पा मारायला, दमल्यावर फ्रेश होण्याकरिता, वाचनालयाकरिता इ. गोष्टींकरिता आपण याचा उपयोग करू शकतो.
(२) आरामखुर्ची- हल्ली ‘सोफा’ पद्धतीमुळे आरामखुर्ची इतिहासजमा होत आहे; परंतु आरामखुर्चीत खरोखरच ‘आराम’ मिळतो. याउलट सोफ्यावर आपण वाकडेतिकडे बसतो आणि पाठदुखीला आमंत्रण देतो.
(३) चटई- सिन्थेटिक किंवा प्लास्टिक चटईपेक्षा बांबूच्या झाडापासून बनवलेली ‘अस्सल’ चटई वापरा आणि फरक अनुभवा.
शून्योपचाराचा आधार घेताना कॉमन सेन्स वापरण्याची अत्यंत गरज आहे. जसे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा तसेच प्रत्येक चिकित्सा पद्धतीच्या मर्यादा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही काही आजारांवर वेळीच डॉक्टरांकडे जाणे हाच पर्याय असतो. अशा वेळी चालढकल उपयोगाची नाही.
सूचना- कृपया ‘स्वअभ्यास’ एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अथवा स्वत:च्या जबाबदारीवर करावा ही विनंती. चूकभूल द्यावी घ्यावी. धन्यवाद.
काही प्रश्नतिनिधिक संदर्भ पुस्तके-
(१)Book on `Water of Life'.
(२)How to stop worrying and start living by Dale Carregie.
(३)Psychocybernetiz Principles for Creative lining by Dr. Maltz.
(४) माझा साक्षात्कारी हृदयरोग- डॉ. अभय बंग.
(५) शून्योपचार- भाग १ व २- श्री. श. प. पटवर्धन.
भालचंद्र गोखले