शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

सगळा भारत माझा देश आहे का ?

महाराष्ट्रातल्या  शाळांतली मुलं सकाळच्या प्रार्थनेनन्तर रोज एक प्रतिज्ञा म्हणतात ' भारत माझा देश आहे, सारे भार्तीय माझे बांधव आहेत ...' वगैरे वगैरे. पण भारतातल्या काही भागात हिण्डताना असं म्हणावसं वाटतं की ' भारत माझा देश आहे, पण सगळा नाही ! ...' असं वाटण्याचं कारण असं की भारतातल्या अनेक ठिकाणी जाताना आपल्याला व्हीसासदृश परवानगी घ्यावी लागते, फोटो द्यावे लागतात, फी भरावी लागते नि ह्यावर ताण म्हणजे तिथे गेल्यावर लोक आपल्याला विचारतात, ' इन्डियातून आलात का ?' किंवा ' इन्डियन गव्हर्नमेंटच्या नियमाशी किंवा करांशी आमचा काही सम्बध नाही ' वगैरे मिजोरामचंही तसंच आहे.

पूर्वांचल

लेखक : अविनाश  बिनीवाले

कॉन्टिनेन्टल  प्रकाशन


नि तिरंगा खाली उतरवला गेला

मूळचे त्रिपुराचे नसलेले 'चकमा' ही आपला जीव वाचवण्यासाठी फार मोठ्या संखेने शेजारीच असलेल्या त्रिपुरात आले, कारण सम्पूर्ण चितगाँव भाग तिथल्या चकमांचा, चकमांच्या इच्छेला मान न देता, नव्हे त्यांची इच्छा धुडकावून सक्तीनं पाकिस्तानात घातला गेला. चकमा नेते दिल्लीत तळ देऊन होते, नेहरूंना आणि पटेलांना पटवण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांच्या आणि भारताच्याही दुर्दैवाने यशस्वी झाले नाहीत नि मुस्लिमांची संख्या नगण्य असलेल्या , हिन्दुबहुल असलेला सम्पूर्ण चितगाँव जिल्हा पाकिस्तानात गेला !

१४ ऑगस्ष्ट, १९४७ रोजी रंगमाटीला जनतेने उत्स्फूर्तपणे तिरंगा फडकवला ! चितगाँव भाग हिन्दु-बौध्द असल्यामुळे असं होण स्वाभाविकच होतं. १४ ऑगस्ष्टनंतर पुढचे तीन दिवस रंगमाटीला जिकडे तिकडे भारताचा तिरंगाच दिमाखात फडकत होता ! चितगाँव जिल्हा भारतात जाईल असं पाकिस्तानलाही १५-१६ ऑगस्ष्टपर्यंत वाटत होतं! मग १७ ऑगस्ष्टला चकमा नेत्यांची धरपकड झाली नि तिरंगा खाली उतरवला गेला. पूर्वाचलाशी सम्पर्क ठेवण्यासाठी भारतला बंगालच्या उपसागरावरच्या एखाद्या बन्दराची आवश्यकता होती नि चितगाँव ह भाग तर पूर्णतः बौध्द नि हिन्दु होता एवढच नाही तर तिथल्या सर्वानी एहमुखानं भारतातचं जाण्याची मागणी केली होती, पण हिन्दु बंगाल्यांना नि बौध्द चकमांना क्रुर लाण्डग्यांच्या तावडीत देऊन आपल्या नेत्यांनी 'तडजोड' केली होती ! ( हे भयंकर वास्तव आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा इतर साहित्यात कधीही, कुठेही डोकावलं नाही, डोकावत नाही, गम्मत आहे ना ?!)


पूर्वांचल


लेखक : अविनाश  बिनीवाले


कॉन्टिनेन्टल  प्रकाशन


नेहरूसरकारचं पाकिस्तानप्रेम

त्रिपुरा हे राज्य उत्तर, पश्चिम, दक्षिण अश्या तीनही दिशांनी बाङ्ला देशानं वेढलेला आहे आणि आगरतला हे राजधानीचं शहर (१९४७ च्या फाळणीमुळे ) अक्षरशः सीमेवर येऊन पडलं ! फाळणीच्या पूर्वी शिलचर-करीम्गंज-सिल्हेट-अगरतला असा लोहमार्ग होता, त्यावरून आगगाड्या धावत होत्या, पण नेहरूसरकारच्या पाकिस्तानप्रेमामुळे आपल्याला मिळालेला सिल्हेट हा भारतातला ( असम राज्याचा ) एक मोठा जिल्हाच आपण पूर्व-पाकिस्तानला सप्रेम भेट म्हणून देऊन टाकला! ह्या औदार्यामुळे आपला बाङ्ला-असमला जोडणारा सिलिगुडीमार्गे जाणारा एकमेव मार्ग वगळता बंगाल-असम, बंगाल-त्रिपुरा, बंगाल-काचार असे बाकीचे सारे लोहमार्ग पूर्व-पाकिस्तानात गेले नि परिणामतः फाळणीनन्तर बराच काळ आगरतल्याला जाणं हे आपल्याला अशक्यच झालं होतं नि दुर्दैवाने ते अजुनही बरंच अवघड आहे !!!

पूर्वांचल

लेखक : अविनाश  बिनीवाले

कॉन्टिनेन्टल  प्रकाशन

सैन्यातला माणूस

सैन्यातल्या  माणसाचं दुदैव हे की ती आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी कुटुंबातल्या कोणाला साथ देऊ शकत नाहीत. सणासुदीला गोड पदार्थाचे घास त्यांच्या आठवणीनं घरच्या माणसांच्या घश्यात अडकतात आणि दुःखाच्या प्रसंगी डोळ्यातून ऒघळणार्‍या धारा त्याना स्वतःच्याच हातानं पुसाव्या लागतात.


रारंग ढांग

लेखक : प्रभाकर पेंढारकर

मौज प्रकाशन

पैसा खाता येत नाही.

केवळ त्या नंतर
जेव्हा  शेवटचं झाड तोडलं जाईल.

केवळ त्या नंतर
जेव्हा  शेवटच्या विहरीचं पाणी विषारी  होईल.

केवळ त्या नंतर
जेव्हा  शेवटचा मासा पकडला जाईल.

केवळ त्या नंतर
तुम्हाला  समजेल, की पैसा खाता येत नाही.


ब्र

ले. कविता महाजन

राजहंस प्रकाशन

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व