तर हा नेता, तिबेट मधून निघाला! वंश,संस्कृती या दृष्टीने तिबेटच्या दक्षिणेस निघून जाणं या नेत्याला स्वाभाविक होतं थायलंड, व्हिएतनाम, कंबोडीया किंवा पूर्वेकडचा कोरिया, जपान या सारखी कितीतरी पितवर्णीय चपट्या नाकांची बौद्धधर्मीय राष्ट्रे याच्या समोर होती पण, यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अगदी ब्रम्हदेश (म्यानमार), नेपाळ यांचाही मार्ग त्यानं अनुसरला नाही. कारण एरवी सामान्य अवाका असलेल्या या नेत्याकडे एक व्यावहारिक शहाणपण होतं, त्याला हे चांगलच माहित होतं की वरील राष्ट्रे त्याच्यासाठी कितीही सोयीची असली तरी चीनसारख्या बलाढ्य देशाशी, याच्यासारख्या य:कश्चित नेत्यासाठी आणि त्याच्या निरर्थक शक्ति-युक्ति-बुद्धी विरहित चळवळीसाठी कोणीही शत्रुत्व ओढवून घेण्याचा मुर्खपणा, बावळटपणा करणार नाही. अशी अनाठायी उठाठेव करून स्वत:चं राजकिय मरण ओढवून घेण्याचा मुर्खपणा केवळ भारतातच होऊ शकतो, हे हेरून या नेत्याची चाल भारताकडे सुरू झाली. त्याच्या रुपानं फार मोठं दुर्दैव आपल्याकडे चालून आलं. त्या नेत्याचं नांव ‘दलाई लामा’ हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
प्रा. चारुचंद्र उपासनी.
friendsofne@gmail.com
‘ईशान्य वार्ता’ या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा.