शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

Showing posts with label सुविचार. Show all posts
Showing posts with label सुविचार. Show all posts

गंगा गंगा म्हणजे काय?



गंगेवर दोन माणसें स्नानासाठी गेली, त्यातील एक जण म्हणतो गंगा गंगा म्हणजे काय? दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सिजन असे दोन वायु एकत्र केले की झाली गंगा. दुसरा म्हणतो भगवान विष्णूच्या पदकमलातून ही निघाली, शंकराच्या जटाजुटात राहिली, हजारो ब्रम्हर्षींनी आणि राजर्षींनी हिच्या तीरावर तपश्चर्या केली, अनंत पुण्यकृत्ये हिच्या काठीं घडली; अशी ही पवित्र गंगामाई या भावनेने ओला होऊन तो स्नान करतो. देहशुद्धीचें फळ दोघांना मिळालेच, परंतु त्या भक्ताला देहशुद्धीबरोबर चित्तशुद्धीचेही फळ मिळाले, गंगेत बैलालाही शुद्धी मिळेल, अंगाची घाण जाईल परंतु मनाची घाण कशी जाणार? एकाला देहशुद्धेचे तुच्छ फळ मिळालें, दुसर्‍याला हे फळ मिळून शिवाय चित्तशुद्धीचे अमोल फळ मिळाले.       

गीता-प्रवचने
विनोबा
परंधाम प्रकाशन, पवनार 

'मुक्त व्हा, मुक्त रहा




स्वामी विवेकानंद म्हणत : ''मुक्त व्हा. मुक्त रहा. कोणाचे बंदिवान होऊ नका. व्यसने तुम्हाला गुलाम करतील. आळस तुम्हाला पराक्रमशून्य करील. तुमचे हे शत्रू तुमच्यावर टपून आहेत. गुहेतील श्वापदाप्रमाणे. माणसे जीवनसत्वांच्या गोळ्या घेतात; पण जीवनातील सत्व हरवून बसतात. सत्वशोधक, स्वत्वबोध या युवकांच्या जीवनातील नियामक शक्ती असल्या पाहिजेत. 



मान खाली घालणे, डोळे मिटून घेणे, नुसते निश्चल राहणे, विशिष्ट रंगाची वस्त्रे धारण करणे म्हणजे चारित्र्यसंपन्न असणे नव्हे. स्वामीजी स्वत: मुक्त आणि पारदर्शक जीवन जगले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले अनेक स्त्री-पुरुष त्यांच्याभोवती भक्तिभावाने उभे राहिले. स्वामीजी हे जनसरोवरातील कमलपत्र ठरले. 

माझा दिवा

जमिनीवर जेवढे रस्ते आहेत तेवढे सागराच्या पृष्ठभागावर नाहीत. तरीसुद्धा हे नाविका, तू आपल्या इछित स्थळी पोहोचतोस. कारण तुझ्या समोर ध्रुवतारा आहे. मी आकाशात चमकणार्‍या प्रत्येक तार्‍याला ध्रुव मानीत बसलो.

घरात मी चोवीस तास दिवा चालू ठेवत असे नि मी खूप सुखी होतो. पण एक दिवस कुणीतरी सांगितले घरात काय थापून घेतले आहेस? बाहेर पडून पाहा. तुझ्यापेक्षा जास्त तेजस्वी दिवे चमकत आहेत.

जास्त प्रकाश आणि सौंदर्य यांच्या शोधात मी बाहेर धावलो. पाहिले तर असंख्य दीपकांमध्ये माझ्या दीपकाएवढाच प्रकाश होता. हसत हसत घरी आलो नि पाहिलं तर माझा दिवा विझला होता.

प्रभात पुष्प

वजु कोटक


Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व