शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

प्रेम म्हणजे काय रे

प्रेम म्हणजे काय रे ऎका प्रसाद कुलकर्णी यांना

गंगाजल

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीलाही गंगाजलाचं तेवढंच आकर्षण होतं. कोलकात्याहून इंग्लंडला जाण्यासाठी कंपनीची जहाजं तीन महिन्यांच्या प्रवासाला निघत, तेव्हा त्या जाहाजांवर (गंगेच्या सर्वात गलिच्छ अशा) हुबळीच्या तीरावरून भरून घेतलेलं जलच असे. त्याचं कारण म्हणजे या तीन महीन्यांच्या प्रवासात ते पाणी कुजून वा सडून जात नसे. उलट इंग्लंडहून जहाजं निघत , तेव्हा घेतलेलं पाणी तीन महिने टिकत नसे. ही जहाजं मुंबईच्या किनार्‍याला येऊन लागेपावेतो, ते पाणी सडून गेलेलं असे आणि त्याचा घोटही घेववत नसे.

प्रसिध्द फ्रेंच डॉक्टर डॉ. डी. हेरेली यांनी गंगेच्या पात्रात कॉलरा वा अतिसारानं मरण पावलेल्यांची काही प्रेतं तरंगताना पाहिली; पण त्या मृतदेहाच्या खालच्या बाजूस पाण्यात अवघ्या काही फुटांवरही अपेक्षेप्रमाणे कॉलरा वा अतिसाराचे लक्षावधी सोडाच, एकही जंतू नावालाही मिळाला नाही. नंतर त्या डॉक्टरनं असे रोग झालेल्यांच्या शरीरातून विषाणू घेऊन गंगाजलात टाकले. काही काळानंतर ते जंतू पुर्णपणे नष्ट झालेले होते.

ग़ंगेच्या पात्रात सोडली जाणारी अनेक रासायनिक द्रव्ये - मूलतः ऑरगँनोक्लोरिंस आणि कार्सिनोजींस यामुळेही डॉल्फिंसना जगणं कठीण होत चाललं आहे. काठावरच्या अनेक उद्योगांमुळे गंगा कमालीची प्रदूषित होत चालली आहे. पॉली, बायफिनेल, बुटा, डाय्बुटा,त्रिबुटा अशी स्थानिक प्लास्टिक कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायनं गंगेला येऊन मिळत आहेत.

या नदीला खरा धोका आहे, तो तिच्या दैवी प्रतिमेतूनच. गंगामातेकडे स्वतःला शुध्द करण्याची ' दैवी शक्ति ' आहे, या श्रध्देमुळेच ही नदी यापुढेही जगू शकेल की मृत्युपंथाला लागेल, यासारख्या महत्वाच्या मुद्य्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय. भारतीयांच्या या नदीकडून असलेल्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. पण आता आणखी फार उशीर होण्यापूर्वी या नदीला नव्यान श्वास घेण्याची फुरसत द्यायला हवी.

गंगा

ज्युलियन क्रॉडाल हॉलिक

अमेय प्रकाशन


गंध

हिरव्याशा गवतात

हळदिवी फुलें,

हलकेंच केसरात

दूध भरूं आले.


उभ्या उभ्या शेतांमधें

सर कोसळली,

केवड्याची सोनफडा

गंधें ओथंबली.


बकुळीच्या आसपास

गंधवती माती,

उस्कटून रानपक्षी

काही शोधिताती.


जोगवा

कवी: आरती प्रभू

मौज प्रकाशनवाराणशी

वाराणशीलाच बनारस म्हणतात किंवा काशीही. वाराणशीभोवती असंख्य दंतकथा गुंफलेल्या आहेत आणि त्यातूनच हे शहर किती पुरानकालीन आहे , त्यावर प्रकाश पडतो. जगाच्या इतिहासातलं सलग वस्ती असलेलं हे बहुधा सर्वात जुनं शहर असल्याचं कायम संगितलं जातं. आपल्या भारतातल्या प्रवासात मार्क ट्वेननं 'बनारस हे इतिहास, परंपरा आणि दंतकथा यापेक्षाही पुरातन आहे.... खरं तर या सगळ्याच्या वयोमानाच्या दुपटीनं !' असं निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे.

जुन्या वाराणशीत खरोखरच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी स्वर्गीय शक्ती वास करत असल्याचं वाटत राहतं .

गंगा

ज्युलियन क्रॉडाल हॉलिक

अमेय प्रकाशन


Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व