शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

एका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी






तर हा नेता, तिबेट मधून निघाला! वंश,संस्कृती या दृष्टीने तिबेटच्या दक्षिणेस निघून जाणं या नेत्याला स्वाभाविक होतं थायलंड, व्हिएतनाम, कंबोडीया किंवा पूर्वेकडचा कोरिया, जपान या सारखी कितीतरी पितवर्णीय चपट्या नाकांची बौद्धधर्मीय राष्ट्रे याच्या समोर होती पण, यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अगदी ब्रम्हदेश (म्यानमार), नेपाळ यांचाही मार्ग त्यानं अनुसरला नाही. कारण एरवी सामान्य अवाका असलेल्या या नेत्याकडे एक व्यावहारिक शहाणपण होतं, त्याला हे चांगलच माहित होतं की वरील राष्ट्रे त्याच्यासाठी कितीही सोयीची असली तरी चीनसारख्या बलाढ्य देशाशी, याच्यासारख्या य:कश्चित नेत्यासाठी आणि त्याच्या निरर्थक शक्ति-युक्ति-बुद्धी विरहित चळवळीसाठी कोणीही शत्रुत्व ओढवून घेण्याचा मुर्खपणा, बावळटपणा करणार नाही. अशी अनाठायी उठाठेव करून स्वत:चं राजकिय मरण ओढवून घेण्याचा मुर्खपणा केवळ भारतातच होऊ शकतो, हे हेरून या नेत्याची चाल भारताकडे सुरू झाली. त्याच्या रुपानं फार मोठं दुर्दैव आपल्याकडे चालून आलं. त्या नेत्याचं नांव दलाई लामा हे तुमच्या लक्षात आलंच असेल.

प्रा. चारुचंद्र उपासनी.
friendsofne@gmail.com       

ईशान्य वार्ता या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा. 

'मुक्त व्हा, मुक्त रहा




स्वामी विवेकानंद म्हणत : ''मुक्त व्हा. मुक्त रहा. कोणाचे बंदिवान होऊ नका. व्यसने तुम्हाला गुलाम करतील. आळस तुम्हाला पराक्रमशून्य करील. तुमचे हे शत्रू तुमच्यावर टपून आहेत. गुहेतील श्वापदाप्रमाणे. माणसे जीवनसत्वांच्या गोळ्या घेतात; पण जीवनातील सत्व हरवून बसतात. सत्वशोधक, स्वत्वबोध या युवकांच्या जीवनातील नियामक शक्ती असल्या पाहिजेत. 



मान खाली घालणे, डोळे मिटून घेणे, नुसते निश्चल राहणे, विशिष्ट रंगाची वस्त्रे धारण करणे म्हणजे चारित्र्यसंपन्न असणे नव्हे. स्वामीजी स्वत: मुक्त आणि पारदर्शक जीवन जगले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले अनेक स्त्री-पुरुष त्यांच्याभोवती भक्तिभावाने उभे राहिले. स्वामीजी हे जनसरोवरातील कमलपत्र ठरले. 

१४ विद्या ६४ कला



१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्याबद्दल आमच्याकडे सतत विचारणाही होत असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.

१४ विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र=१४
१) ऋग्वेद २) यजुर्वेद  ३) सामवेद ४) अथर्ववेद

१) व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२) ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
३) निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
४) कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
५) छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
६) शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.

१) न्याय  मीमांसा  पुराणे  धर्मशास्त्र.

६४ कला
१) पानक रस तथा रागासव योजना- मदिरा व पेय तयार करणे.
२) धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३) दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४) आकर ज्ञान- खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५) वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६) पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७) वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८) व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९) वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०) शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११) अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२) वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३) बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४) चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५) पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६) आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७) कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८) हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९) प्रहेलिका- कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०) प्रतिमाला- अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१) काव्यसमस्यापूर्ती- अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२) भाषाज्ञान- देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३) चित्रयोग- चित्रे काढून रंगविणे.
२४) कायाकल्प- वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५) माल्यग्रंथ विकल्प- वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६) गंधयुक्ती- सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७) यंत्रमातृका- विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८) अत्तर विकल्प- फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९) संपाठय़- दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०) धारण मातृका- स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१) छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२) वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३) मणिभूमिका- भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४) द्यूतक्रीडा- जुगार खेळणे.
३५) पुष्पशकटिका निमित्त ज्ञान- प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६) माल्यग्रथन- वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७) मणिरागज्ञान- रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८) मेषकुक्कुटलावक- युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९) विशेषकच्छेद ज्ञान- कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०) क्रिया विकल्प- वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१) मानसी काव्यक्रिया- शीघ्र कवित्व करणे.
४२) आभूषण भोजन- सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३) केशशेखर पीड ज्ञान- मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४) नृत्यज्ञान- नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५) गीतज्ञान- गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६) तंडुल कुसुमावली विकार- तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७) केशमार्जन कौशल्य- मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८) उत्सादन क्रिया- अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९) कर्णपत्र भंग- पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०) नेपथ्य योग- ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१) उदकघात- जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२) उदकवाद्य- जलतरंग वाजविणे.
५३) शयनरचना- मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४) चित्रकला- नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५) पुष्पास्तरण- फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६) नाटय़अख्यायिका दर्शन- नाटकांत अभिनय करणे.
५७) दशनवसनांगरात- दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८) तुर्ककर्म- चरखा व टकळीने सूत काढणे.
५९) इंद्रजाल- गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०) तक्षणकर्म- लाकडावर कोरीव काम करणे.
६१) अक्षर मुष्टिका कथन- करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२) सूत्र तथा सूचीकर्म- वस्त्राला रफू करणे.
६३) म्लेंछीतकला विकल्प- परकीय भाषा ठाऊक असणे.
६४) रत्नरौप्य परीक्षा- अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.

नंदिनी बोपर्डीकर , रविवार १९ सप्टेंबर २०१०
साभार:  लोकसत्ता

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व