तर हा नेता, तिबेट मधून निघाला! वंश,संस्कृती या दृष्टीने तिबेटच्या दक्षिणेस निघून जाणं या नेत्याला स्वाभाविक होतं थायलंड, व्हिएतनाम, कंबोडीया किंवा पूर्वेकडचा कोरिया, जपान या सारखी कितीतरी पितवर्णीय चपट्या नाकांची बौद्धधर्मीय राष्ट्रे याच्या समोर होती पण, यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अगदी ब्रम्हदेश (म्यानमार), नेपाळ यांचाही मार्ग त्यानं अनुसरला नाही. कारण एरवी सामान्य अवाका असलेल्या या नेत्याकडे एक व्यावहारिक शहाणपण होतं, त्याला हे चांगलच माहित होतं की वरील राष्ट्रे त्याच्यासाठी कितीही सोयीची असली तरी चीनसारख्या बलाढ्य देशाशी, याच्यासारख्या य:कश्चित नेत्यासाठी आणि त्याच्या निरर्थक शक्ति-युक्ति-बुद्धी विरहित चळवळीसाठी कोणीही शत्रुत्व ओढवून घेण्याचा मुर्खपणा, बावळटपणा करणार नाही. अशी अनाठायी उठाठेव करून स्वत:चं राजकिय मरण ओढवून घेण्याचा मुर्खपणा केवळ भारतातच होऊ शकतो, हे हेरून या नेत्याची चाल भारताकडे सुरू झाली. त्याच्या रुपानं फार मोठं दुर्दैव आपल्याकडे चालून आलं. त्या नेत्याचं नांव ‘दलाई लामा’ हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
प्रा. चारुचंद्र उपासनी.
friendsofne@gmail.com
‘ईशान्य वार्ता’ या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा.
1 comments:
अत्यंत एकतर्फी विचार करून हे आर्टिकल लिहिलेलं आहे.
आपल्या महितीकरता
१) http://en.wikipedia.org/wiki/14th_Dalai_Lama
२) http://www.dalailama.com/messages/तिबेट
आपण दलाई लामांचं आत्मचरित्र वाचलं असेल (Freedom in exile) तर त्यात त्यांनी आपण भारतातच आश्रय का घेतला याचं सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. अजून एक सन्दर्भ म्हणजे वि.ग.कानिटकर यांचं 'कालखुणा' हे पुस्तक पहा. आपल्याला सत्य स्थितीची जाणीव होईल. तिबेटचा ताबा अत्यंत अन्यायकारक पद्धतीने घेतला गेला हे आपण नाकारू शकत नाही. म्हणुनच दलाई लामांना आश्रय हा मुर्खपणा नसून भारताच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आजन्म तिबेटी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी तळमळणारे दलाई लामा कुठल्याही स्वातंत्र्ययोध्यापेक्षा कमी नाहीत.
चीनच्या अन्यायी पाशातुन दलाई लामा निसटुन आले, त्यांना आपण आश्रय दिला यात मुर्खपणा कसला? या न्यायाने हिटलरशी हातमिळवणी करणारे मुसोलिनी, सेयस इनक्वार्ट किंवा क्विसलिंग हे द गॉलला आश्रय देणा-या चर्चिलपेक्षा शहाणे ठरतील. द गॉलच्या रुपाने चर्चिलने विकतचं श्राद्ध घेतलं हे म्हणणं जितकं चुकीचं, तितकचं आपलंही मत चुकीचं आहे.
Post a Comment