शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

गंगा गंगा म्हणजे काय?



गंगेवर दोन माणसें स्नानासाठी गेली, त्यातील एक जण म्हणतो गंगा गंगा म्हणजे काय? दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग ऑक्सिजन असे दोन वायु एकत्र केले की झाली गंगा. दुसरा म्हणतो भगवान विष्णूच्या पदकमलातून ही निघाली, शंकराच्या जटाजुटात राहिली, हजारो ब्रम्हर्षींनी आणि राजर्षींनी हिच्या तीरावर तपश्चर्या केली, अनंत पुण्यकृत्ये हिच्या काठीं घडली; अशी ही पवित्र गंगामाई या भावनेने ओला होऊन तो स्नान करतो. देहशुद्धीचें फळ दोघांना मिळालेच, परंतु त्या भक्ताला देहशुद्धीबरोबर चित्तशुद्धीचेही फळ मिळाले, गंगेत बैलालाही शुद्धी मिळेल, अंगाची घाण जाईल परंतु मनाची घाण कशी जाणार? एकाला देहशुद्धेचे तुच्छ फळ मिळालें, दुसर्‍याला हे फळ मिळून शिवाय चित्तशुद्धीचे अमोल फळ मिळाले.       

गीता-प्रवचने
विनोबा
परंधाम प्रकाशन, पवनार 

महाराष्ट्राचा बंडखोर लोककवी




महाराष्ट्राच्या हातापायात गुलामगिरीच्या शृंखला अडकवण्याचा जेव्हा जेव्हा कोणी डाव मांडतो, तेव्हा तेव्हा ते दास्य झुगारून देण्यासाठी आणि त्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्रात बंडखोर निर्माण होत असतात. आणि त्या बंडखोरांच्या हाकेला सार्‍या महाराष्ट्राकडून साद मिळते. धर्ममार्तंडांनी आणि पंडीतांनी धर्माची तत्वे आणि विद्या ब्राम्हणांच्या किल्ल्यात आणि संकृतच्या कड्याकुलपांत बंदिस्त करून जनतेला वर्षानूवर्षे आज्ञानांत आणि दास्यात ठेवले. त्या विरूद्धा ज्ञानेश्वरांनी गोदावरीच्याकाठी बंडाचा झेंडा  प्रथम उभारला आणि ते ज्ञानाचे आणि विद्येचे भांडार मराठी भाषेत वाहून घरोघरी पोहोचते केले. परकीय मोगल सत्तेच्या महापुरात अवघे महाराष्ट्रा भुमंडळ बुडून सर्व मराठी बुद्धी आणि कर्तबगारी नामशेष होण्याची जेव्हा पाळी आली तेव्हा त्या सत्ते विरूद्ध बंडाचा भगवा झेंडा तोरणागडावर उभारण्यासाठी हातात भवानी तलवार घेऊन आणि कृष्णा घोडीवर स्वार होऊन महाराष्ट्राचा पहिला बंडखोर छत्रपती अवतीर्ण झाला. वेदस्थापित धर्माचे देव्हारे माजवून, वर्णश्रेष्ठतेचे पोकळ नगारे वाजवून, टिळे टोपी घालणार्‍या नि साधुत्वाचा आव आणणार्‍या दांभिकांनी जेव्हा महाराष्ट्रातील अडाणी बहुजनांना आत्मोद्धाराचे सारी मार्ग बंद करून टाकले तेव्हा इंद्रायणीच्या काठी भंडार्‍याच्या डोंगरावर एका देहूच्या वाण्याने बंडाची पताका उभारली आणि नुसत्या नामसंकीर्तनाच्या सामर्थ्यावर वैकुंठपेठ खाली ओढून आणण्याचा अभंगमंत्र महाराष्ट्राला दिला.

महाराष्ट्र ही बंडखोरांची भुमी आहे. या भुमीमध्ये गेल्या सातशे आठशे वर्षात अनेक मोठीमोठी बंडे झालेली आहेत.
महाराष्ट्राच्या रक्तात बंड आहे, ते कधी थिजत नाही.
महाराष्ट्राच्या मासांत बंड आहे, ते कधी गोठत नाही.
महाराष्ट्राच्या हाडात बंड आहे, ते कधी मोडत नाही.
महाराष्ट्राच्या डोक्यात बंड आहे, ते कधी वाकत नाही.
महाराष्ट्राच्या डोळ्यात बंड आहे, ते कधी विझत नाही.
महाराष्ट्राच्या छातीत बंड आहे, ते कधी हटत नाही.
महाराष्ट्राच्या मनगटात बंड आहे, ते कधी पिचत नाही.


प्र.के. अत्रे

निवडक नवयुग
१९८०-१९६०
मॅजेस्टिक बुक हाऊस
मुल्य:  ७५०















        

फक्त लढ म्हणा...



विषाणू



ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार
(
शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना
पहिला नंबर मिळाला
.

out dated झालंय आयुष्य
स्वप्नही
 download होत नाही
संवेदनांना
 'virus' लागलाय
दु
:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत

delete 
झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं

range 
नसलेया mobile सारखे

hang 
झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट

जाती माती जोडणारी

कुठेच नाही
 website

एकविसाव्या शतकातली

पीढी भलतीच
 'cute'
contact list 
वाढत गेली
संवाद झाले
 mute

computer 
च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय

अन
 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय


floppy Disk Drive 
मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही

अन फाटली मनं सांधणारा

internet 
वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत

केवढी मोठी चूक

रक्ताच्या नात्यांनाही

आता लागते 
facebook................

देशाला एक गांधी पुरेसे होते


alt
लोकशाहीत अण्णांच्या मार्गाचे महत्त्व आहेच. लोकांच्या रागाला आवाज देण्याचे व सरकारला धक्के देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. सरकारला वेळोवेळी जाब विचारणारा कोणीतरी लागतोच. पण त्या व्यक्तीच्या मागे जाऊन सर्वचजण जाब विचारू लागले तर राष्ट्राची निर्मिती थांबते. जाब विचारणारा एकजण पुरतो, नवनिर्मिती करणारे शंभरजण लागतात. देशाला एक गांधी पुरेसे होते, शंभर सरदार पटेल हवे होते. दुर्दैवाने देशात एकच सरदार जन्मले व शंभर गावगांधी जाब विचारू लागले. ‘एव्हरीबडी वॉन्ट्स टू कंट्रोल थिंग्ज.. नोबडी वॉन्ट्स टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी’ हे श्रीधरन यांचे निरीक्षण देशाची सद्यस्थिती दाखविते. देशाला एक अण्णा पुरेसे आहेत, तर अनेक श्रीधरन हवे आहेत. 


Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व