लोकशाहीत अण्णांच्या मार्गाचे महत्त्व आहेच. लोकांच्या रागाला आवाज देण्याचे व सरकारला धक्के देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. सरकारला वेळोवेळी जाब विचारणारा कोणीतरी लागतोच. पण त्या व्यक्तीच्या मागे जाऊन सर्वचजण जाब विचारू लागले तर राष्ट्राची निर्मिती थांबते. जाब विचारणारा एकजण पुरतो, नवनिर्मिती करणारे शंभरजण लागतात. देशाला एक गांधी पुरेसे होते, शंभर सरदार पटेल हवे होते. दुर्दैवाने देशात एकच सरदार जन्मले व शंभर गावगांधी जाब विचारू लागले. ‘एव्हरीबडी वॉन्ट्स टू कंट्रोल थिंग्ज.. नोबडी वॉन्ट्स टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी’ हे श्रीधरन यांचे निरीक्षण देशाची सद्यस्थिती दाखविते. देशाला एक अण्णा पुरेसे आहेत, तर अनेक श्रीधरन हवे आहेत.
संपुर्ण लेख वाचा आकलन : दोन मार्ग : अण्णा आणि ई श्रीधरन!
0 comments:
Post a Comment