शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

निवडक – नवयुग


निवडक नवयुग

प्रकाशक मॅजेस्टिक बुक हाऊस

किंमत ७५० पृष्ठे ५१२

आज संपादकाचे स्वातंत्र्य खरोखर राजकिय पुढर्‍यांनी व पत्राच्या धनिक आश्रयदात्यांनी हिरावून घेतले आहे. वैयक्तिक, राजकिय महत्वाकांक्षा असलेल्या नामधारी संपादकांच्या, संचालकांच्या, ट्रस्टींच्या व आश्रयदात्यांच्या रागलोभाचे उसने अवसान आणून खर्‍याखुर्‍या संपादकांना लिहावे लागते. वृत्तपत्रे ही निरनिराळ्या पक्षाची असली तरी पुढार्‍यांच्या इतका पक्षभिनिवेश धारण न करता वृत्तपत्रांनी सत्यनिष्ठ व जास्तीत जास्त निःपक्षपाती असावे अशी खर्‍या संपादकाची इछा असते. परपक्षाप्रमाणे स्वपक्षावरही टीका करावी अशी त्याची प्रवृत्ती असते. पण आज वृत्तसंपादकांना हे अशक्य झाले आहे.

वृत्तपत्रांवर सत्तर वर्षांपुर्वी केलेले हे भाष्य आजच्या काळातही किती समर्पक आहे नाही? ०५ मे १९४० च्या नवयुगमध्ये आचार्य अत्र्यांची लिहीलेल्या अग्रलेखाचा हा काही भाग.


Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व