स्वामी विवेकानंद म्हणत : ''मुक्त व्हा. मुक्त रहा. कोणाचे बंदिवान होऊ नका. व्यसने तुम्हाला गुलाम करतील. आळस तुम्हाला पराक्रमशून्य करील. तुमचे हे शत्रू तुमच्यावर टपून आहेत. गुहेतील श्वापदाप्रमाणे. माणसे जीवनसत्वांच्या गोळ्या घेतात; पण जीवनातील सत्व हरवून बसतात. सत्वशोधक, स्वत्वबोध या युवकांच्या जीवनातील नियामक शक्ती असल्या पाहिजेत.
मान खाली घालणे, डोळे मिटून घेणे, नुसते निश्चल राहणे, विशिष्ट रंगाची वस्त्रे धारण करणे म्हणजे चारित्र्यसंपन्न असणे नव्हे. स्वामीजी स्वत: मुक्त आणि पारदर्शक जीवन जगले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले अनेक स्त्री-पुरुष त्यांच्याभोवती भक्तिभावाने उभे राहिले. स्वामीजी हे जनसरोवरातील कमलपत्र ठरले.
0 comments:
Post a Comment