शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

कमरपट्टा

सिंगापूर एअर लाईंन्सच्या आलिशान विमानात आम्हाला 'सूट' होत नसलेल्या सुटा-बुटात कलकलाट करत आम्ही बावीस जण शिरलो तेव्हा ब्रिटिश प्रवासी वर्ग-विशेषतः महिलांच्या काळजाचा ठोकाच चुकला. रेल्वेत, एस्टीत किंवा बोटीत घुसावं तशीच आम्ही एन्ट्री केली होती.कित्येक जण पहिल्यांदाच विमानातून प्रवास करीत होते. त्यामुळे 'सामान खय ठेवचा ?' हे बहुतेकाना माहीत नव्हतं.

विमानातल्या हवाई सुंदर्‍या त्वरीत आमच्या मदतीला धावून आल्या. देखण्या हवाई सुंदर्‍या लगबगीने काहीजणांना कमरेला पट्टा बांधायला मदत करू लागल्या. खरं म्हणजे अगदी सोपी कृती होती ती! परंतु इतरानी हे जेव्हा पाहिलं तेव्हा आपणाला कमरेला पट्टा बांधताच येत नाही, असा अभिनय करायला सुरवात केली.कारण त्यांना हवाई सुंदरीच्या नाजूक हातांनी कमरपट्टा बांधून घ्यायचा होता.


व्हाया वस्त्रहरण


लेखकः गंगाराम गवाणकर


डिंपल पब्लिकेशन

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails
There was an error in this gadget

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व