"वस्त्रहरण नाटक घेवन आमी बुवा लंडनाक चल्लव" असं जेव्हा मच्छिंद्र कांबळीने जाहीर केलं तेव्हा मालवणी मुलखातून मालवणी स्टाईलने प्रतिक्रिया उमटली ती अशी...
'फटकेक खाव – ह्येंका एस्टी आणि बोटीच्या उताराक पैसे गावनत नाय, म्हणान तीन-तीन वर्सा गावाचा त्वांड बगनत नाय, ते मायझये लंडनला कसे काय जातले ?'
परंतु अनाऊन्स केल्याप्रमाणे ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला म्हणजे १३ ऑक्टोबर १९८४ रोजी रात्री ठीक १० वाजता 'भद्रकाली प्रॉडक्शन' च्या मुंबईच्या सहार एअरपोर्टवर २२ खलाशांना ( कलावंतांना) नेण्यासाठी दादर टीटीला छबिना (बस) तयार होती. अर्थात या छबिन्याचा नाखवा होता पांडुतात्या सरपंच मच्छिंद्र कांबळी !
व्हाया वस्त्रहरण
लेखकः गंगाराम गवाणकर
डिंपल पब्लिकेशन
0 comments:
Post a Comment