इझराएलच्या निर्मितीच्या काळापासून पॅलेस्टाइनमध्ये निर्वासित म्हणून आलेल्या गरीब बिचार्या अरबांच्या छावण्या आहेत, आज सुमारे साठ वर्षे ते निर्वासित छावण्यामध्येच रहात आहेत, किती भयंकर ! पण ह्या अरबांबद्दल, त्यांच्या वाईट परिस्थितीबद्दल पाश्चात्य जगतातच नव्हे तर भारतातही खूप बोललं जातं, लिहिलं जातं (ते योग्याच आहे), पण खुद्द आपल्याच देशात पूर्व बंगाल मधून आलेले अनेक हिन्दु आणि बौध्द अजूनही , म्हणजे पॅलेस्टाइन अरब रहात आहेत तेवढ्याच काळापासून निर्वासित छावण्यात रहात आहेत. त्यांची स्थिती अरबांसारखी , किंबहुना त्याहून वाईट आहे ह्या बद्दल आमच्या माध्यमांमधून कधी एखादी बोटभर बातमीही येत नाही, असं का? वर्षानुवर्षे छावण्यात रहाणाचा त्रास अरबांनाच होतो, हिन्दुंना आणि बौध्दांना होत नाही असं काही आहे का? परदुःख शीतल असं म्हणतात, पण इथे तर उलटाच प्रकार दिसतो.
पूर्वांचल
लेखक : अविनाश बिनीवाले
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
0 comments:
Post a Comment