महाराष्ट्रातल्या शाळांतली मुलं सकाळच्या प्रार्थनेनन्तर रोज एक प्रतिज्ञा म्हणतात ' भारत माझा देश आहे, सारे भार्तीय माझे बांधव आहेत ...' वगैरे वगैरे. पण भारतातल्या काही भागात हिण्डताना असं म्हणावसं वाटतं की ' भारत माझा देश आहे, पण सगळा नाही ! ...' असं वाटण्याचं कारण असं की भारतातल्या अनेक ठिकाणी जाताना आपल्याला व्हीसासदृश परवानगी घ्यावी लागते, फोटो द्यावे लागतात, फी भरावी लागते नि ह्यावर ताण म्हणजे तिथे गेल्यावर लोक आपल्याला विचारतात, ' इन्डियातून आलात का ?' किंवा ' इन्डियन गव्हर्नमेंटच्या नियमाशी किंवा करांशी आमचा काही सम्बध नाही ' वगैरे मिजोरामचंही तसंच आहे.
पूर्वांचल
लेखक : अविनाश बिनीवाले
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
0 comments:
Post a Comment