मूळचे त्रिपुराचे नसलेले 'चकमा' ही आपला जीव वाचवण्यासाठी फार मोठ्या संखेने शेजारीच असलेल्या त्रिपुरात आले, कारण सम्पूर्ण चितगाँव भाग तिथल्या चकमांचा, चकमांच्या इच्छेला मान न देता, नव्हे त्यांची इच्छा धुडकावून सक्तीनं पाकिस्तानात घातला गेला. चकमा नेते दिल्लीत तळ देऊन होते, नेहरूंना आणि पटेलांना पटवण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांच्या आणि भारताच्याही दुर्दैवाने यशस्वी झाले नाहीत नि मुस्लिमांची संख्या नगण्य असलेल्या , हिन्दुबहुल असलेला सम्पूर्ण चितगाँव जिल्हा पाकिस्तानात गेला !
१४ ऑगस्ष्ट, १९४७ रोजी रंगमाटीला जनतेने उत्स्फूर्तपणे तिरंगा फडकवला ! चितगाँव भाग हिन्दु-बौध्द असल्यामुळे असं होण स्वाभाविकच होतं. १४ ऑगस्ष्टनंतर पुढचे तीन दिवस रंगमाटीला जिकडे तिकडे भारताचा तिरंगाच दिमाखात फडकत होता ! चितगाँव जिल्हा भारतात जाईल असं पाकिस्तानलाही १५-१६ ऑगस्ष्टपर्यंत वाटत होतं! मग १७ ऑगस्ष्टला चकमा नेत्यांची धरपकड झाली नि तिरंगा खाली उतरवला गेला. पूर्वाचलाशी सम्पर्क ठेवण्यासाठी भारतला बंगालच्या उपसागरावरच्या एखाद्या बन्दराची आवश्यकता होती नि चितगाँव ह भाग तर पूर्णतः बौध्द नि हिन्दु होता एवढच नाही तर तिथल्या सर्वानी एहमुखानं भारतातचं जाण्याची मागणी केली होती, पण हिन्दु बंगाल्यांना नि बौध्द चकमांना क्रुर लाण्डग्यांच्या तावडीत देऊन आपल्या नेत्यांनी 'तडजोड' केली होती ! ( हे भयंकर वास्तव आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा इतर साहित्यात कधीही, कुठेही डोकावलं नाही, डोकावत नाही, गम्मत आहे ना ?!)
पूर्वांचल
लेखक : अविनाश बिनीवाले
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
0 comments:
Post a Comment