मुंबईतली ऎशी टक्के माणसं ही अशा तुटपुंज्या जागेतच राहत असतात. सकाळी त्यांचं घर म्ह्णजे धावपळीत पाणी भरायची जागा – ‘नळघर’ असते. नंतर उभ्या घराचं जणू किचन होऊन जातं. दुपारनंतर घराची ही एकुलती एक खोली म्हणजे लिव्हिंगरूम होते. रात्री तीच खोली बेडरूम होते. रंगमंचावर कसे नेपथ्यबदल होत जातात, तसंच घडत राहतं या घरात. तरीही... घराचं नाटक होऊ न देता इथली माणसं गुण्यागोविंदाने, मनःपुर्वक जगत राहतात.
डॉ. नंदा केशव मेश्राम यांची आत्मकथा
सुमेध वडावाला (रिसबूड)
डिंपल प्रकाशन
0 comments:
Post a Comment