जमिनीवर जेवढे रस्ते आहेत तेवढे सागराच्या पृष्ठभागावर नाहीत. तरीसुद्धा हे नाविका, तू आपल्या इछित स्थळी पोहोचतोस. कारण तुझ्या समोर ध्रुवतारा आहे. मी आकाशात चमकणार्या प्रत्येक तार्याला ध्रुव मानीत बसलो.
घरात मी चोवीस तास दिवा चालू ठेवत असे नि मी खूप सुखी होतो. पण एक दिवस कुणीतरी सांगितले ‘ घरात काय थापून घेतले आहेस? बाहेर पडून पाहा. तुझ्यापेक्षा जास्त तेजस्वी दिवे चमकत आहेत.’
जास्त प्रकाश आणि सौंदर्य यांच्या शोधात मी बाहेर धावलो. पाहिले तर असंख्य दीपकांमध्ये माझ्या दीपकाएवढाच प्रकाश होता. हसत हसत घरी आलो नि पाहिलं तर माझा दिवा विझला होता.
वजु कोटक
0 comments:
Post a Comment