शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

आपण त्यांना पाडू शकता

हो, हो! आपण त्यांना पाडू शकता, जी, हाँ। आप उन्हें हरा सकते है।माफ करा पण दुर्दैवाने हा नारा माझा नाही; पण मला नक्की आवडेल असं म्हणायला. खरं तर तुम्ही दुबळे, षंढ नसाल, तर आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून, तुम्हीही हे म्हणू शकता. नुसतं म्हणूनच नाही तर प्रत्यक्षात अमलात आणू शकता.
१९६७ च्या काळात, निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे बलाढय़ नेते स. का. पाटील आणि त्या वेळच्या संयुक्त समाजवादी पार्टीचे नेते, जॉर्ज फर्नाडिस यांच्यामधील ही अटीतटीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती. जॉर्ज फर्नाडिस यांचा एकच प्रभावी नारा होता. मुंबईभर जागोजागी, इंग्रजी, हिंदी, मराठीत त्यांचा एकच नारा होता. आप उन्हें हरा सकते है। आपण त्यांना पाडू शकतारस्त्यावर, इलेक्ट्रिकच्या खांबावर, बस स्टॉपवर, बसवर, रेल्वे स्थानकांवर, पोस्टर्सवर, सगळीकडे फक्त एकच वाक्य आपण त्यांना पाडू शकता’.
विरोधक या वाक्याची खिल्ली उडवत होते आणि चमत्कार झाला. ज्यांना या मुंबईचा अनभिषिक्त सम्राटअसं संबोधलं जायचं, ते स. का. पाटील चक्क पडले’. जॉर्ज फर्नाडिस यांनी त्यांना एका वाक्यानंपाडलं. ही अतिशयोक्ती वाटेल, पण हा इतिहास आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारा इतिहास! आज त्या घटनेनंतरच्या ४०-४२ वर्षांनंतर हे असं घडू शकेल? या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल? आपण मनात आणलं, तर निष्क्रिय, भ्रष्ट, नाठाळ, बाप कमाईवर टेंभा मिरवणाऱ्या, सरंजामशाहीची चटक लागलेल्या उमेदवारांना आजही आपण पाडू शकतो? होय! मनात आणलं तर, आपणही त्यांना पाडू शकता..
आपली मराठी भाषा, आपले मराठी संस्कार, आपली महाराष्ट्रीय संस्कृती यांच्या नाकावर टिच्चून एखादा राजकीय पक्ष, जर आपला प्रदेशाध्यक्षच, ‘अमराठीनेता असेल तर इतर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी बहुधा बांगडय़ा भरल्या असाव्यात. परप्रांतियांनी उच्च पदावर बसून, आपल्याला आपल्या संस्कृतीचे धडे द्यावेत आणि ते आपण झेलावेत यासारखी दुसरी लाचारी नाही. पण मग अन्याय झाल्यावर गरळ ओकण्यापेक्षा, आताच का नाही निर्णय घ्यायचा? तुमच्या घरात, परका माणूस ठाण मांडून बसला आणि त्याला हवी ती मनमानी तो करू लागला, तर तुम्ही काय अतिथी देवो भवम्हणत, त्याला हवं ते त्याच्या पदरात वाढाल? परप्रांतियांच्या त्या उंटांना तुमच्या तंबूत घेतल्यावर तो निरुपमी उंट अजून तंबू मागतोय, त्याचे तुम्ही चोचले पुरवणार? नाही ना? मग मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता..
राजकारणाच्या या पटावर प्याद्यांच्या, लिंबू-टिंबूंच्या, लगोरीच्या, साईसुटय़ोच्या किंवा संगीतखुर्चीच्या खेळात, मला फसवलं असं म्हणत, जर अजून दहा बारा डोकी गोळा केली, दहावी-पंधरावी आघाडी बनवली आणि तुम्ही समुद्रात स्मारक बांधलं, तर आम्ही पण समुद्रात स्मारक बांधूअशी बालिश गर्जना केली, तर अशा बालिश घोषणांनी या राज्याचे आर्थिक प्रश्न सुटतील? गरिबी नष्ट होईल? एका ठराविक समाजाचे लोक साक्षर, सुशिक्षित होतील? डाव त्यांच्या हातात येईल? मग असा रडीचा डाव खेळणाऱ्यांना राज्याचे फासे टाकायला द्यायचे? नाही ना? एवढं कळण्याइतके तुम्ही सुबुद्ध आहात ना ? मग मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता.
आपल्या मुलाबाळांची, पचनशक्ती, बौद्धिक क्षमता किती, हे जन्मदाते म्हणून आपण जाणतोच ना? तुम्हाला पंचपक्वान्नं आवडतात म्हणून तुम्ही मुलाबाळांना बकासुर बनवत नाही ना? ऐपत नसताना, नकटय़ा नाकाच्या, शेळकाटय़ा मुलीला दागदागिन्यांनी, उंची पेहरावांनी मढवून, बार्बी डॉल बनवून आपलीच शोभा करून घेत नाही ना? मग हे मुंबई शहर, ही मुंबापुरी, तुमची-आपली कर्मभूमी! तिला न झेपणाऱ्या लोंढय़ांची, अवाढव्य प्रकल्पांची, दिखाव्याच्या शांघायप्रतिकृतीची खरच गरज आहे? स्वातंत्र्यदेवता ३०० फूट उंच, म्हणून आमचा अश्वारूढ पुतळा, त्याहून काही सेंटिमीटर उंच? हे राज्य, इथली अर्थव्यवस्था म्हणजे काय पोरखेळ आहे का? राज्याच्या विकासाची उंची वाढवण्याऐवजी, निर्जीव घोडय़ाची उंची वाढवण्यात या हावरट राज्यकर्त्यांना रस का? समुद्रात स्मारक बांधायच्या अट्टाहासापायी, हे खारं पाणी अनेक ठिकाणी मुरतंय, हे कळण्याइतके आपण सज्ञान आहोत ना? मग त्या मनमानी राज्यकर्त्यांसमोर, आपण षंढासारखे हतबल का? त्यांच्याच हाती परत सत्ता सोपवायचा नाइलाजका? मनात आणलं, तर आपणही त्यांना पाडू शकता..
भाषावार प्रांतरचनेनुसार ५० वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा प्रांत मिळाला; परंतु आपली भाषा प्राचीन आहे, समृद्ध आहे हे कोणी विसरायच्या आत आठवण करून द्यावीशी वाटते की, ती आपली मातृभाषासुद्धा आहे. आज त्याचेही जागतिक हक्कराजकारण्यांनी वाटून घेतले आणि मग त्या जागतिक हक्काच्या लोण्याचा गोळा कोणी फस्त करायचा यावरून रस्सीखेच सुरू झाली. मराठी अस्मिता जितकी महत्त्वाची तितकीच मराठी भाऊबंदकीसुद्धा जगाला दाखविण्याइतकी सर्वश्रेष्ठ आहे का? आपला प्रांत सोडून सीमोल्लंघन केलंत तर मराठी माणूसम्हणून इतर भाषिकांच्या लक्षात राहते ती मराठी भाऊबंदकी!मराठी अस्मितेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा, वीज, रस्ता, पाणी या माणसाच्या महत्त्वाच्या गरजांपेक्षाही ही भाऊबंदकीआणि पातळी सोडून वापरलेली भाषा हाच या राजकारण्यांचा २ी’’्रल्लॠ स्र््रल्ल३ आहे का? आपण भाषा जपू या, भाषेचं संवर्धन करू या असं म्हणत म्हणत आपल्या मुलाबाळांना मात्र परकीय भाषेत ज्ञानेश्वरीशिकवायची आणि आपल्याकडे मतांचा जोगवा मागताना मात्र गरळ ओकणारी मातृभाषा वापरायची, याची या राजकारण्यांना लाज कशी नाही वाटत? खुर्चीसाठी भीक मागताना महाराष्ट्राच्या भाषेला- संस्कृतीला लाज आणणारे संस्कृतिरक्षक तुम्हाला भूषणावह वाटतात? नाही ना? मग मनात आणलंत तर आपणही त्यांना पाडू शकता..
आपली संस्कृती, आपला धर्म, आपली राष्ट्रभाषा, आपली राष्ट्रभक्ती, आपला स्पष्टवक्तेपणा, आपली शिस्तबद्धता याचा सदैव गर्वबाळगणारे आज इतरांना ब्रह्मज्ञान शिकवतायत, पण स्वत: मात्र..? इतरांच्या घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवत स्वत:ही तीच घराणेशाही आता लोकांच्या, जनतेच्या माथी मारायला सुरुवात केलीच ना? यंदाच्या या निवडणुकीत तर त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी वाट्टेल ती लाचारीपत्करण्याची भूमिका घेतली. आपल्याच कुटुंबातल्या लेकराबाळांच्या कपाळी टिळे लावून, त्यांनाच वाऱ्यावर सोडून आपलंच घर शेजाऱ्याला दान देऊन टाकलं. धर्माला जागणाऱ्यांनी अख्खा शेजारधर्मच पाळायचा ठरवल्यावर, परधर्मीय शेजाऱ्याचा बापही यांना सर्वश्रेष्ठवाटायला लागला. मग आपलं राष्ट्रप्रेम, आपली कट्टर भूमिका, आपली तत्त्वनिष्ठता या सगळ्यांना तिलांजली देऊन त्यांनी त्या बापाचंया घरात बसून गुणगान सुरू केलं. मग कसा ठेवायचा यांच्या राष्ट्रभक्तीवर विश्वास? हे असले बेगडी राष्ट्रप्रेम बाळगणारे, आपल्या प्रांतावर, आपल्या राज्यावर काय प्रेम करणार? कशी असेल यांना आपल्यामातृभाषेची आणि आपल्या राज्याच्या विकासाबद्दल आपुलकी? कशावरून हे असला शेजारधर्म पाळायची लाचारी स्वीकारणारे संघटित लोकहे महाराष्ट्रघर उद्या परप्रांतीयांना आंदण देणार नाहीत? इतकं कळण्याइतके तुम्ही सुबद्ध आहात ना? मग मनात आणलंत तर आपणही अशा संधिसाधू, मतलबींना पाडू शकता..
सत्तेची खुर्ची उबदारच असते. आपणच ती उबदार बनवली. त्यामुळे इथे सत्तेच्या खुर्चीसाठी खरं तर सगळेच हपापलेले! वेळप्रसंगी लाळ गाळत ती मिळवण्याची स्वप्ने पाहणारे! आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आपणच बनवली ना ती उबदार? मग त्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी अजूनही काही लायक मंडळी आहेत इथं! त्यातले अनेकजण अजूनही मनअसणारे, आपल्याबरोबर इतरांच्याही भावना, इतरांचं हित, इतरांचा स्वाभिमान जपणारे आहेत. त्यांची सदसद्विवेकबुद्धी अजूनही जागृत आहे. त्यांना जाणीव आहे, तुमचा खेळखंडोबा होणाऱ्या शिक्षणाची! त्यांना जाणीव आहे, तुमच्या हायजॅकहोणाऱ्या भाषेची अन् संस्कृतीची!! त्यांना काळजी आहे, तुमच्या हकनाक जाणाऱ्या जीवाची! त्यांना काळजी आहे, तुमच्या मूलभूत गरजांची, तुमच्या दोन वेळच्या जेवणाची!! त्यांना कणव आहे तुमच्या सुखी-समृद्ध जीवनाची!
त्यांच्या हाती सोपवा नेतृत्व! या सत्तेच्या बाजारात स्वत:ला विकायला निघालेल्या नेत्यांमधला नेमका आपला माणूसनिवडून काढा, वेचून काढा. तो आपलाआहे, याची खात्री पटवून द्या. मग नको तिथं जात, पात, धर्म किंवा कुठलीही राजकीय लेबलं! झिडकारून टाका त्या बाजारबसव्या राजकारण्यांची मक्तेदारी. इथं सुखी-सुदृढ-समृद्ध जीवन जगायला माणुसकीच लागते हो! आणि ती माणुसकी जपणारा, ओळखणारा आपला माणूस’! एवढं कळण्याइतके आपण सारे सुबुद्ध आहोत ना? तुमचा निर्णय चार दिवसांवर येऊन ठेपलाय.
मग या पंचवार्षिक बाजाराचा वीट कसा नाही आला अजून? प्रदूषण आणि धकाधकीच्या जीवनापासून लांब, दोन दिवस काही क्षण निरामय शांतता मिळावी म्हणून वीकएण्ड होम्सशोधताच ना? मग तसंच या बाजारबुणग्यांपासून सुटका करून शांत, निर्मळ जीवन जगू देईल असा देवमाणूसनिवडून आणणे हे स्वप्नवत वाटत असलं तरीही.. आपणच हे करू शकता!

संजय पेठे - sanjaypethe@yahoo.com


0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व